हरियाणा: हरियाणाच्या 94 वर्षीय भगवानी देवी या आजीबाईंनी फिनलँडच्या टेम्परे येथे झालेल्या वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅंम्पियनशिपमध्ये सुवर्ण आणि कांस्य अशा दोन पदकांना गवसणी घातली आहे.
भगवानी देवी यांनी 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. तर शॉटपुट खेळात कांस्य पदकावर नाव कोरले.