Type Here to Get Search Results !

आटपाडी पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण जाहीर : वाचा बातमी सविस्तर



आटपाडी : आटपाडी पंचायत समितीच्या सन २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गण निहाय आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी संतोष भोर व तहसीलदार बी.एस. माने यांनी जाहीर केले.


आटपाडी तालूक्याती पुर्वी जिल्हा परिषदेचे चार गट तर पंचायत समितीचे ८ गण होते. नव्या रचनेनुसार जिल्हा परिषदेचे पाच गट तर पंचायत समितीचे दहा गण निर्माण झाले आहेत. यामध्ये नेलकरंजी, खरसुंडी, विठ्ठलापुर, दिघंची, करगणी, माडगुळे, आटपाडी, कौठुळी, निंबवडे, घरनिकी असे पंचायत समितीचे गण आहेत. 


नेलकरंजी गणासाठी अनु.जाती, खरसुंडी ओबीसी महिला, विठ्ठलापुर ओबीसी, दिघंची सर्वसाधारण महिला, करगणी सर्वसाधारण महिला,माडगुळे सर्वसाधारण महिला, आटपाडी सर्वसाधारण महिला, कौठुळी सर्वसाधारण, निंबवडे सर्वसाधारण, घरनिकी सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies