Type Here to Get Search Results !

म्हसवड एमआयडीसी स्थलांतर केल्यास सर्वपक्षीय आंदोलन:डॉ.संदिप पोळम्हसवड/अहमद मुल्ला : मुंबई बंगलोर धर्तीवर मंजूर असणारी माण तालुक्यात म्हसवड कॅरोडर एमआयडीसी शिंदे सरकारने स्थलांतरित करू नये अन्यथा सर्वपक्षीय आंदोलन उभे करू असा इशारा माण खटावचे युवा नेते डॉ. संदिप पोळ यांनी दिला आहे.


माण तालुक्यातील म्हसवड येथे मंजूर असलेली एमआयडीसी कोरेगावला स्थलांतरित होणार असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे.त्या पार्श्वभूमीवर डॉ. संदिप पोळ यांनी आपली भूमिका मांडली असून ते म्हणाले की, एमआयडीसी स्थलांतर हा विषयावर चर्चा सुरू असताना याची माहिती घेतली असून ती वस्तुस्थिती आहे. २०२० साली माण तालुक्यातील म्हसवडला मंजुरी मिळालेल्या या एमआयडीसी साठी जागा संपादित करण्यात आली व त्यावर तसे शिक्के सुध्दा मारण्यात आले आहेत. मात्र मधल्या काळात या एमआयडीसी संदर्भात काही घडामोडी घडल्या व याबाबत वेगळी चर्चा सुरू झाली.


दुष्काळी भागातील ही एमआयडीसी स्थलांतर केल्यास येथील विकासाला खीळ बसणार आहे व माण व खटाव सह लगतच्या माळशिरस,आटपाडी, सांगोला या माणदेश व दुष्काळी भागावरचा अन्याय असल्याचे पोळ यांनी म्हटले आहे. माण व खटाव हे कायमस्वरूपी  दुष्काळी म्हणून गणले गेले आहेत या तालुक्यावर प्रथम पासूनच सगळ्या बाबतीत अन्याय झाला आहे. शेतीच्या व पिण्याच्या पाण्यापासून अद्यापही माण तालुका वंचित असताना व कायमस्वरूपी  निर्मित अन्याय झालेला हा भाग आहे.


कोरेगाव येथे एमआयडीसी स्थलांतर करण्याचा निर्णयावर बोलताना डॉ. पोळ म्हणाले की, सातारा, फलटण, वाई, खंडाळा हे उदयोग क्षेत्र कोरेगावलाच लगत असताना दुष्काळी भागातील एमआयडीसी स्थलांतर करण्याचा सरकारचा हेतू काय याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.असे घडल्यास दुष्काळी भागावर अन्याय होऊन तरुणांच्या हाताला काम मिळणार नाही व पर्यायी वाढलेल्या बेरोजगारी आणखी वाढणार आहे. म्हसवड येथील एमआयडीसी साठी केंद्रकडून साडे तीन हजार कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध झाला आहे मात्र म्हसवड येथे जागा उपलब्ध असतानाही जागा उपलब्ध नसल्याचा शासकीय अहवाल हाच स्थलांतर करण्याचा ठोस पुरावा आहे असे पोळ यांनी सांगितले.


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथशिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही एमआयडीसी स्थलांतर करू नये अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली असून सरकार दुष्काळी भागाचा सहानुभूती पूर्वक विचार करेल अशी अपेक्षा डॉ. पोळ यांनी व्यक्त केली आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies