Type Here to Get Search Results !

यंदा हॅट्रिकच होणार : पुरोगामी सेवा मंडळाचे हैबतराव पावणे यांच्यासह एकवीस उमेदवारांचा विजय निश्चित : संजय कबीर



आटपाडी : आटपाडी तालुक्यातील बहुतांशी शिक्षक बंधू भगिनी यांचा स्पष्ट कौल पुरोगामी सेवा मंडळाच्या बाजूने आहे. आज पर्यंत शिक्षक बँकने केलेल्या चांगल्या कामाच्या जोरावर व ऐतिहासिक निर्णयावर सामान्य शिक्षक सभासदांचा ठाम विश्वास असून इथून पुढच्या काळात पारदर्शी कारभार व सर्व कर्जाचा एक अंकी व्याजदर करण्यासाठी व उच्चतम लाभांश देण्यासाठी तसेच मयत कर्जदार सभासदांसाठी संपूर्ण कर्जमाफी  या सारख्या अनेक योजना राबवणारे पुरोगामी सेवा मंडळ यांच्या पॅनेलला विमान या चिन्हावर शिक्का मारून मत रुपी आर्शिवाद द्यावा असे आवाहन शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष संजय कबीर यांनी केले.


पुढे बोलताना ते म्हणाले, पुरोगामी शिक्षक मंडळाच्या चांगल्या कामामुळे मतदारांच्या साथीने  विजय निश्चित आहे. यावेळी माजी सरचिटणीस नानासाहेब झुरे, रुग्णालयाचे संचालक श्रीकांत कुंभार, बाबासाहेब शेख, श्याम ऐवळे, प्रवीण बाड,  उन्मेश शेटे, हरिभाऊ जावीर, रमेश विभुते, जोतीराम सोळसे, इन्ताब इनामदार, विजय पवार, सत्यवान माने, दिनेश माने,  भिमराव सावंत, किशोर पिसे, सिराज तांबोळी, सत्यजीत भांबुरे, चंद्रकांत गवळी,  जगदीश खाडे, बापूसाहेब औंधकर, सचिन म्हेत्रे, सर्जेराव पुजारी, सतीश पुसावळे, बाळासाहेब वाघमारे, विनोद पुंड, विजय वाघमारे, आदि शिक्षक बांधव उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies