Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, रविवार ३१ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष: 

एखादे जुने स्वप्न पूर्ण होईल.  दिवस मनाप्रमाणे घालवाल. सकारात्मक विचारातून यशस्वी व्हाल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल. सामाजिक जाणीव ठेवून वागाल.



वृषभ:-

समतोल विचार करून पहावा. जोडीदाराकडून सहकार्याची अपेक्षा ठेवाल. अति चिकित्सा करू नका. मानसिक चंचलता जाणवेल. मित्रांची बाजू जाणून घ्यावी.



मिथुन:-

सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल. प्रगतीचा मार्ग खुला होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल.



कर्क:-

मोहाला बळी पडू नका. मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी. कामाचा वेग वाढेल. जोडीदाराविषयी मनात शंका बाळगू नका. गोड बोलून कामे करून घ्यावीत.



सिंह:-

वरिष्ठांची कौतुकाची थाप पडेल. आज आशादायक ग्रहमान राहील. दिनक्रम व्यस्त राहील. हाती घेतलेले काम तडीस न्याल. कामाचा जास्त बोजा घेऊ नका.



कन्या:-

व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध होईल. काही कामे कमी श्रमात पार पडतील. जोडीदार तुमच्यावर नाराज होऊ शकतो. रेस-जुगारातून लाभ संभवतो. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल.



तूळ:-

अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विरोधकांचा रोष मावळेल. भागीदाराशी सुयोग्य चर्चा कराल. अति उत्साहावर नियंत्रण ठेवा.



वृश्चिक  :-

जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. नसती काळजी करू नका. प्रिय व्यक्तीची नाराजी दूर होईल. आज आराम करण्याची इच्छा निर्माण होईल. कामातून समाधान लाभेल.



धनू :-

कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. मुलांबरोबर अधिक वेळ घालवाल. छंद जोपासण्यासाठी वेळ काढा. काही  जुने प्रश्न मार्गी लागतील. दिवस प्रसन्नतेत उगवेल.



मकर:-

घरात तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. व्यायामात आळस करू नका. जोडीदाराच्या उत्पन्नात वाढ होईल. घरातील वातावरण खेळते राहील. दिवस मजेत जाईल.



कुंभ:-

ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. मानसिक चंचलता टाळावी. प्रेमसंबंध घट्ट करण्याचा प्रयत्न करावा. भावंडांची मदत मिळेल. कोणालाही दुरूत्तर करू नका.



मीन:-

नवीन संकल्पना कृतीत उतरवा. बागकामाची आवड जोपासाल. उतावीळपणा करू नये. मित्र मंडळींचे सहकार्य घ्याल. कौटुंबिक कामात वेळ जाईल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies