Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शनिवार ३० जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

मानसिक संतुलन राखावे.  हस्तकलेला वाव द्यावा. भावंडांना मदत कराल. चांगले साहित्य वाचनात येईल. नवीन ओळखी होतील.



वृषभ :-

मनातील इच्छा पूर्ण होईल. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मैत्रीचे संबंध जपावेत. नवीन योजनांकडे बारीक लक्ष ठेवा.



मिथुन:-

विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. योजनाबद्ध कामे करावीत. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाका. नातेवाईकांना मदत कराल.



कर्क:-

जुनी कामे पूर्ण करण्यावर भर द्या. ज्येष्ठ मंडळींशी तारतम्यतेने वागा. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करा. अनावश्यक खर्च टाळा. स्वत:विषयीचा चुकीचा ग्रह काढून टाका.



सिंह:-

अचानक धनलाभाची शक्यता. दिवसभर संयम बाळगावा लागेल. काही नवीन खरेदी करण्याची संधी लाभेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. कामात दिवसभर गढून जाल.



कन्या:-

नवीन कल्पना कृतीत आणाल. हातून शुभकार्य घडेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. रागावर नियंत्रण ठेवा. संयमाने कामे करावीत.



तूळ:-

आरोग्य विषयक तक्रारी जाणवतील. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. नवीन कामाची योजना आखाल.  जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. दिवसभर कामाचा ताण राहील.



वृश्चिक:-

गुंतवणूक करताना सावध राहावे. मुलांच्या खोडकरपणाकडे लक्ष ठेवा. क्षुल्लक गोष्टींवरून नाराज होऊ नका. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल.



धनू:-

जमिनीच्या कामात गुंतवणूक कराल. समोर आलेली संधी ओळखा. आईशी वादाचे प्रसंग टाळावेत. जोडीदाराकडून तुमची इच्छा पूर्ण होईल. दैनंदिन कामात थोडासा बदल करून पहावा.



मकर:-

मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे लागेल. निर्धारित कामात आळस करू नका. स्वत:साठीही थोडा वेळ काढावा. योग्य वेळेची वाट पहावी. भावंडांशी मतभेद टाळावेत.



कुंभ:-

गरजेच्या वस्तु खरेदी कराल. मौसमी आजारांपासून काळजी घ्यावी. चैनीवर खर्च कराल. आपलेच म्हणणे खरे कराल. निराशाजनक विचार टाळावेत.



मीन:-

व्यापारात जोखीम पत्कारावी लागेल. संयमाने समस्या सुटू शकतात. बरेच दिवसानी नातेवाईकांची गाठ पडेल. मुलांशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात. दिवस अनुकूल राहील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies