पुणे: पिंपरी-चिंचवडमधील एका ३५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अनेक दिवसांनंतर कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे नसल्यामुळे त्यांच्यावरती होते. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, मागिल १५ दिवसांपासून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
आज एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिला ४ जुलै रोजी रुग्णालयात दाखल झाली होती सदर महिलेला कोरोनासह अन्य व्याधी देखील होत्या असे वैद्यकीय विभागातून सांगण्यात आले आहे. आतापर्यंत ४ हजार ६२५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या १ हजार ४५८ सक्रिय रुग्ण आहेत.