Type Here to Get Search Results !

“शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नादाला लागून...”: ‘यांचे’ मोठे वक्तव्य!



बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे आज बारामती येथे पत्रकारांशी बोलत होते.


यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली, चंद्रकांत पाटलांनी एकनाथ शिंदेबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना मिटकरी म्हणाले, 'एकनाथ शिंदे नावाची व्यक्ती देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमला चालत नाही, ही खदखद चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नादाला लागून तुमचे थोर पण घालवू नका यांच्या मनात प्रामाणिकपणा नाही, हे त्यांनी आज सिद्ध करून दाखवले असल्याची टीका चंद्रकात पाटलांवर केली.



तसेच, सध्याच सरकार हे घटनाबाह्य सरकार आहे. सर न्यायाधीश रमणा हे घटनेचे अभ्यासक आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यावर हे २ मंत्र्यांचे सरकार लवकरच कोसळेल. शिवाय मध्यावती निवडणूका लागल्या तर राष्ट्रवादीचा चांगला परफॉर्मन्स दिसेल, कार्तिकी एकादशीची पूजा ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते असते. पण मध्यावती निवडणूका जर लागल्या तर मुख्यमंत्री म्हणून पांडुरंगाची पूजा अजित पवार करतील असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies