Type Here to Get Search Results !

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत केले ‘हे’ मोठे बदल!



सोलापूर:  राज्यात शिंदे -फडणवीस सरकार स्थापन केले आहे.  शिवसेना पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 



सोलापूर जिल्हा संपर्क पदावरुन आमदार तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदावर आता अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते. यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.


दरम्यान, अनिल कोकीळ मुंबईतील शिवडीतले नगरसेवक आहेत. कोकीळ हे उद्धव ठाकरे यांचे जवळचे मानले जातात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies