Type Here to Get Search Results !

“मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काळजी वाटते कारण...”: सुप्रिया सुळे!



पुणे - मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काळजी वाटते. कारण मला वाटते  की त्यांच्यामागे मोठे षडयंत्र सुरु आहे. एकनाथ शिंदे यांना मुद्दामून प्रॉम्प्टिंग करणे, त्यांना चिठ्ठी पाठवणे यातून मुख्यमंत्र्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान मी सहन करणार नाही असे मोठे वक्तव्य  सुप्रिया सुळे यांनी केले आहे.



तसेच त्या पुढे म्हणाल्या, ”नवीन आलेले सरकार हे कन्फ्युज्ड सरकार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान होणाऱ्या अनेक गोष्टी चॅनल वर दिसत आहे. हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. या राज्याचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा नसतो तो राज्याचा मुख्यमंत्री असतो. माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सातत्याने अपमान करत असेल तर माझा स्वाभिमान जागा आहे आणि जागा राहिली. दिल्लीपुढे हा महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही आणि झुकणार नाही असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.



दरम्यान,  पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागमार्फत महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सेस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सहभागी झालेल्या महिलांना सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकर यांच्या हस्ते प्रमाणपात्र वाटप करण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies