Type Here to Get Search Results !

देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय झपाट्याने


नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 18 हजार 930 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 35 जणांचा मृत्यू झाला. बुधवारच्या तुलनेत आज सुमारे अडीच हजार अधिक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 1,19,457 वर पोहोचली आहे. तर दैनंदिन सकारात्मकता दर आता 4.32% टक्क्यांवर पोहोचला आहे. 


देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमधील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रात दिवसागणिक 3 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहे. बुधवारी महाराष्ट्रात 3142 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली. 


महाराष्ट्रपाठोपाठ तामिळनाडूमध्येही कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी तामिळनाडूमध्ये कोरोनाचे 2,743 नवीन रुग्ण आढळले आहेत. मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, गेल्या 24 तासांत 1,791 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. राजधानी चेन्नईमध्ये 1,062 नवीन रुग्ण आढळले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies