Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, गुरुवार २८ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष: 

कौटुंबिक सलोखा राहील. अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आहारावर नियंत्रण हवे. विलासी जीवनाची अनुभूति घ्याल.



वृषभ:-

जोडीदाराची मोलाची साथ मिळेल.  कामाचा आवाका वाढेल. दांपत्य जीवनातील गोडी वाढेल. आळस झटकून कामे करावीत. मित्रांचे सहकार्य मिळेल. 



मिथुन:-

उत्तम व्यावसायिक लाभ होईल.  धरसोडपणा टाळून निर्णय घ्यावा. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. महत्त्वाच्या योजनांकडे लक्ष द्या. चांगल्या बदलाची अपेक्षा ठेवा.



कर्क:-

नियोजित कामे बरगळू शकतात. लपवाछपवीची कामे करू नका. नवीन ओळख लाभदायक ठरेल. नवीन संधीच्या शोधात राहाल. वरिष्ठांना खुश करावे लागेल.



सिंह:-

महत्त्वाच्या निर्णयात जोडीदाराचा सल्ला घ्यावा. आध्यात्मिक प्रगती होईल. दिवस मनोरंजनात घालवाल. काही महत्त्वाच्या वस्तू खरेदी कराल. झोपेची थोडीफार तक्रार जाणवेल.



कन्या:-

कौटुंबिक नातेसंबंध जपाल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. आर्थिक स्तर सुधारेल. योजनाबद्ध कामे सफल होतील. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.



तूळ:-

आवडत्या कामात वेळ जाईल. आर्थिक ताण कमी होईल. नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. प्रिय व्यक्ती सोबत नातेसंबंध सुधारतील.



वृश्चिक:-

हातचे राखून बोलाल. मन काहीसे विचलीत राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. वाढीव जबाबदारी अंगावर घ्याल. कौटुंबिक समस्या जाणवू शकतात.



धनू:-

जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.  परिस्थितीतून शांततेने मार्ग काढाल. आरोग्याबाबत दक्ष राहावे. अनावश्यक गोष्टीत वेळ वाया घालवू नका. सरकारी कामात अडथळे येऊ शकतात.



मकर:-

कौटुंबिक कामात मन रमवा. मुलांच्या मताला प्राधान्य द्यावे. तडजोडीला पर्याय नाही. समोरील परिस्थितीचा स्वीकार करावा. अति भावनाशील होऊ नका. 



कुंभ:-

मानसिक ताण घेऊ नका. ज्येष्ठ बंधुंची मदत होईल. अनुभवाचा उपयोग करून घ्यावा. बोलताना इतरांचे मन दुखवू नका. वादाच्या प्रसंगांपासून दूर रहा.



मीन:-

दिवस उत्साहात जाईल.  नवे निर्णय घ्यायला सवड मिळेल. मनोरंजन क्षेत्रातील लोकांना उत्तम दिवस. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. ज्येष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies