Type Here to Get Search Results !

पुन्हा एकदा सीएनजी व पीएनजी दरात वाढ; जाणून घ्या दर!




मुंबई:  महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी दरात पुन्हा एकदा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे तर पीएनजीच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना आता सीएनजी 80 प्रति किलोने खरेदी करावा लागेल तर पीएनजीच्या दरातही वाढ होऊन तो 48.50 रुपये करण्यात आला आहे. 



देशांतर्गत गॅसच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम एमजीएच्या उत्पादन किमतीवर होत असून, त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीएनजीच्या किमतीत चार रुपये तर पीएनजीच्या किमतीत तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.



दरम्यान, स्थानिक पातळीवर गॅसच्या सप्लायमध्ये कमतरता निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे महानगर गॅस लिमिटेडने सांगितले आहे. वाढलेले नवीन दर हे आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies