Type Here to Get Search Results !

ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक; अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू!



भंडारा : गुरूवारी सकाळी भंडारा साकोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 मोहघाट जंगल परिसरामध्ये नादुरुस्ती स्थितीमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत ट्रॅव्हल्स चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  रायपूर येथून प्रवाशांना घेऊन हंसा ट्रॅव्हल्स नागपूरला निघाली होती. भंडारा साकोली महामार्ग क्रमांक 6 मोहघाट परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक भीषण असल्याने , ट्रॅव्हल्सचा समोरील भागाचा चुरा झाला. या घटनेत ट्रॅव्हल्स चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅव्हल्समधील अन्य प्रवाशी सुद्धा जखमी झाले.



दरम्यान,  जखमी प्रवाशांना साकोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ट्रॅव्हल्समध्ये जखमी झालेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies