Type Here to Get Search Results !

“धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ…” ‘यांची’ शिवसेनेवर खोचक टीका!



मुंबई : शिवसेनेला एकनाथ शिंदे गटाने बंडाळी करुन धक्का दिला. तसेच, भाजपच्या मदतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकारही स्थापन झाले. यानंतर शिंदे गटाने शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरही नेम लावला असून यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आले आहे.


 याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालीनी ठाकरे यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. रेल्वे इंजिन भाड्याने द्या, म्हणून उपदेश देणार्‍यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे, असा टोला त्यांनी शिवसेनेसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.



राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला मनसेने पाठिंबा दर्शवल्यानंतर शिवसेना विरुद्ध मनसे असा राजकीय सामना रंगला आहे. दरम्यान,  आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध मनसे अशी जोरदार लढत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies