Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरेंसाठी मोठी डोकेदुखी; मुंबईतील ३० नगरसेवक शिंदे गटात सहभागी?



नवी मुंबई : आता ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईत देखील शिनसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे.  कारण, नवी मुंबईतील तब्बल ३० शिवसेना नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांची भेट घेणार असून हे ३० नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 



नवी मुंबईतील जवळपास ३० नगरसेवक शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती समोर येत असून हे नगरसेवक आज रात्री मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहते . या नगरसेवकांमध्ये ऐरोली विधानसभेतील २० आणि बेलापूर विधानसभेतील १० असे एकूण 30 नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. 


दरम्यान, आता सत्ताकेंद्र बदलल्यामुळे आणि शिंदे गटाची ताकद वाढल्यामुळे शिवसेनेतील होणारी नगरसेवकांची गळती ही उद्धव ठाकरेंसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies