Type Here to Get Search Results !

‘या’ कारणामुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा अडचणीत!



मुंबई:  विठ्ठलाची शासकीय पूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करणार हे ठरले आहे. शासकीय पूजेचे निमंत्रणही शिंदे यांना देण्यात आले आहे, पण काल निवडणूक आयोगाने ९२ नगरपरिषदांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा अडचणीत आला आहे.



त्यामुळे,  निवडणूक आयोगाच्या परवानगी नंतरच एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा पार पडणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची परवानगी घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पंढरपूर मधील शासकीय पूजेचे कार्यक्रम पार पडतील असे सांगण्यात येत आहे.



दरम्यान, राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुकांच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया २० जुलैपासून सुरु होणार आहे. पुणे जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांसाठी निवडणुका होणार आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies