Type Here to Get Search Results !

सावधान! महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट बीए.5 आढळले रुग्ण!



नवी दिल्ली:  गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट बीए.5 ची लागण झाल्याले रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.



महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दोन रुग्णांना ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट बीए.5 ची लागण झाल्याचे समोर आले आहे. दोन रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुण्यात पाठवण्यात आले होते. हे  दोन्ही रुग्ण महाराष्ट्राच्या बाहेरील आहेत. सध्या व्यावसायिक कारणास्तव पुण्याच्या ग्रामीण भागांत वास्तव्यास आहेत.



दरम्यान, शुक्रवारी राज्यात 2515 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 2449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल (शुक्रवारी) एकूण सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies