Type Here to Get Search Results !

"...त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नसावा"; ‘यांनी’ सांगितले कारण!



नागपूर : 'मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये, दोघे म्हणतात आम्ही दोघे काम करतो आहे. मात्र, हे शक्य नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडे जाणार असेल तर ते शक्य नाही. त्यांना एवढं मोठं बहुमत मिळालं आहे. त्यांनी ते विधानसभेतही दाखविले आहे. मग मंत्रिमडळ विस्तार का करत नाहीत असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.



तसेच सत्ता बदल होताना मोठ्या प्रमाणावर आश्वासन देण्यात आली त्याची पूर्तता कठीण होत आहे. म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होत नाही का? असे ऐकले आहे. भाजपकडे 115 आमदार आहेत भाजप कार्यकारणी मधील रोख लक्षात घेतला तर आमदारांनी त्यागाची भावना ठेवा असे सांगण्यात आले. तिकडे शिंदे गटातूनही कोण मंत्री होणार कोण राज्यमंत्री होणार असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे विस्तार होत नसावे असे वक्तव्य अजित पवार यांनी  यावेळी केले.



दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार आज दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलत असताना राज्य सरकारवर निशाणा साधला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies