Type Here to Get Search Results !

किरकोळ वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या!



पुणे : किरकोळ वादातून एका तरुणाने त्याच्या मित्राला बांबुने बेदम मारहाण करत हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना कोंढव्यातील खडी मशीन चौकाजवळ घडली असून याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुरेश राजू कसोटिया (32) असे हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर तौसिफ साजीद बागवान (22) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  सुरेश व तौसिफ हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. ते दोघे बिगारी काम करत होते. शुक्रवारी रात्री दोघेजण कोंढवा येथील खडी मशीन चौकाजवळ आले होते. त्यावेळी किरकोळ कारणावरुन त्यांच्यात भांडण झाले. त्यामध्ये तौसिफने सुरेशला बांबुने जबर मारहाण केली. या मारहाणीत सुरेश गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान सुरेशचा मृत्यू झाला.



दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी काही वेळातच सुरेशचा मित्र तौसिफ बागवान याला अटक केली. तौसिफची चौकशी केल्यानंतर त्याने हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies