Type Here to Get Search Results !

“...म्हणून विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर राहिलो”: विजय वडेट्टीवार यांनी सांगितले गैरहजेरीचे कारण!



नागपूर : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर का राहिलो याचे कारण सांगितले. 



वडेट्टीवार म्हणाले, 'विधानसभा अध्यक्ष ठरल्यावर विश्वास दर्शक ठराव होता, आधी चर्चा मग ठराव होईल असे आम्हाला वाटले. मात्र, विधानभवनाच्या गेटवर पोहचल्यावर गेट बंद झाले. मात्र, याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. आम्ही गैरहजर राहिलो याकडे वेगळ्या पद्धतीने बघू नये. कुठलाही संबंध निर्माण केला जाऊ नये. आमच्या राजकीय जीवनावर कुठलेही प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ नये असे वडेट्टीवार म्हणाले



दरम्यान, त्यांनी यावेळी ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हायला पाहिजेत अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies