Type Here to Get Search Results !

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती होणार कमी?; जाणून घ्या आजचे दर!



नवी दिल्ली: भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल  -डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आजच्या नव्या दरांनुसार, देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या 51 दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. तसेच,  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. सध्या कच्च्या तेलाच्या दरांत घट झाली आहे.  कच्च्या तेलाचे दर घटल्यामुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  



आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.88 रुपये तर डिझेलचा दर 95.37 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.74 रुपये तर डिझेलचा दर 96.20 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.08 रुपये तर डिझेलचा दर 95.59 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.34 रुपये तर डिझेलचा दर 95.84 रुपये प्रति लिटर आहे.


 

दरम्यान,  आंतरराष्ट्रीय बाजारातील आजच्या कच्च्या तेलाच्या किमतींत पुन्हा घसरण झाली आहे.  डब्ल्यूटीआय क्रूड आज प्रति बॅरल 1.38 डॉलरनं घसरल्यानंतर प्रति बॅरल 102.7 डॉलरच्या दरावर आहे. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 1.21 डॉलरने घसरल्यानंतर प्रति बॅरल 105.9 डॉलरवर आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies