Type Here to Get Search Results !

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ ; जाणून घ्या आजचे दर!



नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सध्या अनेक चढ-उतार सुरु आहेत. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर पोहोचली आहे. अशातच पेट्रोल-डिझेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरांनुसार,  आज देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 



आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.88 रुपये तर डिझेलचा दर 95.37 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.74 रुपये तर डिझेलचा दर 96.20 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.08 रुपये तर डिझेलचा दर 95.59 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.34 रुपये तर डिझेलचा दर 95.84 रुपये प्रति लिटर आहे. 



दरम्यान, आता महाराष्ट्रात सत्तापालट झाला आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना पेट्रोल-डिझेलच्या दरांत कपात करणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. या निर्णयाची घोषणा कधी होणार? किमतींमध्ये दिलासा कधी मिळणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष वेधले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies