Type Here to Get Search Results !

१९ वर्षीय तरुणाने महिलांच्या फोटोची बनवली पॉर्न क्लिप अन...!



मुंबई :  मुंबई पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणाला आरोपी तरुणाने शहरातील तब्बल 24 हून अधिक महिलांच्या सोशल मीडिया अकाऊंटचा गैरवापर केल्याने ताब्यात घेतले आहे. प्रशांत आदित्य (वय 19) असे आरोपी तरुणाचे नाव असून त्याला गुजरातमधील गांधीनगरमधून पोलिसांनी अटक केली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, आरोपी तरुणाने शहरातील तब्बल 24 हून अधिक महिलांच्या सोशल मीडिया अकाऊंटचा गैरवापर केला. आरोपीने महिलांच्या इन्स्टाग्रावरून त्यांचे फोटो काढून आधी पॉर्न क्लिप बनवली. त्यानंतर ती व्हायरल करण्याची धमकी देत महिलांकडे पैशांची मागणी केली. आरोपीची महिलांकडून पैसे उकळण्याची पद्धत अशी होती की, पैसे तातडीने दिल्यास 500 रुपये आणि एक दिवस उशीर झाला तरी 1000 रुपये घ्यायचा. यामुळे याप्रकरणी काही महिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 


दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी अंतर्गत महिलेचा विनयभंग, लैंगिक छळ, खंडणी इत्यादी प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies