Type Here to Get Search Results !

मेहुणीने लग्नाला नकार दिल्याने तरुणाने केले ‘हे’ भयंकर कृत्य!



बुलढाणा : खामगाव शहरानजीक असलेल्या एका गावात रविवारी सायंकाळी  मेहुनीने  लग्नास नकार दिल्याने जावयाने सासू आणि मेहुणीवर कोयत्याने वार केले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी  जावयाविरोधात गुन्हा दाखल केला.


याबद्दल अधिक माहिती अशी कि, ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील वृद्ध महिलेच्या थोरल्या मुलीचा जळगाव खानदेश जिल्ह्यातील एका गावातील असलेल्या आरोपीशी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर जावयाचा पत्नीच्या धाकट्या बहिणीवर जीव जडला. त्यामुळे त्याने नात्याचा कोणताही विचार न करता, धाकटीशी विवाह लावून देण्यासाठी वृद्ध सासूवर दबाव आणला. तसेच मेहुणीला सोबत येण्यासाठी धमकी दिली. 



दरम्यान, सासूने लग्नास नकार दिल्याने चिडून जावयाने सासूवर कोयत्याने वार केले. यावेळी वाद सोडविण्यास गेलेल्या मेहुणीवरही त्याने वार केले. याप्रकरणी तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून ग्रामीण पोलिसांनी जावयाविरोधात गुन्हा दाखल केला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies