Type Here to Get Search Results !

एकादशी दिवशीच मरण यावे म्हणून वृद्ध महिलेने केले ‘हे’ भयंकर कृत्य!



औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर परिसरात रविवारी रात्री उशिरा  वृद्ध महिलेने  आजाराला कंटाळून एकादशीच्या दिवशी अंगाला गावरान तूप लावून पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कावेरी भास्कर भोसले (वय - ८०) असे या वृद्धेचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  रविवारी एकादशीच्या दिवशी दिवसभर भजन, हरिपाठ केल्यानंतर रात्री कुटुंबातील सदस्य झोपण्यासाठी गेले असता, त्या स्वतः वरच्या मजल्यावर गेल्या. वरच्या मजल्यावर गेल्यावर कावेरी यांनी बाथरूममध्ये जाऊन आधी सुती कापड हाताला गुंडाळले. त्यावर गावरान तूप ओतले. काही तूप अंगालाही लावले. त्यांनतर काडी ओढून त्यांनी स्वतः पेटवून घेतले. तूप टाकलेले असल्याने कापडाने लगेचच पेट घेतला यानंतर त्यांना त्यांच्या मुलाने व सुनेने घाटी येथील रुग्णालयात दाखल केले.मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.



दरम्यान, या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies