Type Here to Get Search Results !

“शिवसेना फुटली त्याचे श्रेय भाजपाने घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंचेच..”, राज ठाकरेंचा टोला!



मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे जर आज असते, तर हे शक्यच झाले नसते, असे सांगत संजय राऊत यांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नसतात, असा टोला राज ठाकरे यांनी  लगावला. 



शिवसेना फुटली त्याचे श्रेय भाजपाने घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंचेच आहे.  तसेच, माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले होते. मी त्यांना म्हटले उगाच फुकटचे श्रेय नका घेऊ नका, जी गोष्ट घडली आहे ती गोष्ट नाही तुम्ही घडवली, ना अमित शाहांनी घडवली, ना भाजपने घडवली ना अजून कोणी घडवली. याचे श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावे लागेल. जी गोष्ट घडलेली आहे त्याचे तुम्ही श्रेय कसे काय काढून घेऊ शकता? कारण त्यांच्यामुळे हे काय एकदा घडले नाही, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच, जे काय सगळे आरोप प्रत्यारोप झाले आणि सगळ्यांनी संजय राऊत यांना झोडून काढले. यामध्ये संजय राऊत यांचा काय संबंधं? मी समजू शकतो रोज ते टेलिव्हिजनवर यायचे, रोज काही ना काही बोलायचे, ज्याने माणसं इरिटेट होऊ शकतात. पण संजय राऊतांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नसतात, असेही राज ठाकरे यांनी वक्तव्य केले.



तसेच ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री पद आपल्याला दिले नाही, असा आव शिवसेना नेत्यांनी आणला. उद्धव ठाकरे शेजारी बसलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील असे म्हटले होते. त्यानंतर अमित शहा यांनी देखील भाजपचाच मुख्यमंत्री होईल असे म्हटले होते. तेव्हा उद्धव ठाकरेंनी का आक्षेप घेतला नाही. तेव्हा का नाही ते बोलले. जेव्हा विधानसभेचा निकाल लागला तेव्हा यांना आठवले का? असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies