Type Here to Get Search Results !

पोलीस कर्मचाऱ्यानेच पंख्याला गळफास घेत केली आत्महत्या!



पुणे : पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. सुनील शिंदे (४८) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, शिंदे हे लोणी काळभोर भागात असणाऱ्या कदम वाकवस्ती मध्ये राहत होते. काल बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे शिंदे त्यांच्या खोलीत झोपायला गेले. मात्र, आज सकाळपासूनच त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. त्यांच्या मुलाने आवाज देऊनही शिंदे यांनी दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्यांच्या मुलाने खिडकीतून पाहिले. त्यानंतर शिंदे यांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. 



दरम्यान,  शिंदे यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies