Type Here to Get Search Results !

शिंदे गटातील आणखी ‘या’ दोन बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी!



मुंबई : आता आज  मंगळवारी रवींद्र फाटक यांची देखील शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती आहे. 


रवींद्र फाटक यांच्यासोबत राजेश शहा यांचीही शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेकडून शिंदे गटातील बंडखोर आमदार रवींद्र फाटक यांची पालघर जिल्हासंपर्क प्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शाह हकालपट्टी यांचीही करण्यात आली आहे.



पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती सामनाच्या अग्रलेखातून तसेच शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies