मुलांची नजर चुकवून वडिलांनी घेतला गळफास!जळगाव : शिवाजीनगरातील काळेनगरात घरात लहान मुले अभ्यास करत असताना या ‎मुलांच्या‎ ‎पाठीमागे‎‎ पलंगावर‎ झोपलेल्या ‎पित्याने अचानक पंख्याला गळफास घेत आत्महत्या‎ केली. समाधान रामदास सुरवाडे (वय‎ ४५, रा. काळेनगर, शिवाजीनगर)‎ असे मयताचे नाव आहे. अचानक पित्याला लटकलेला पाहून मुलांनी किंचाळतच घराबाहेर धाव घेतली शेजाऱ्यांच्या मदतीने दवाखान्यात दाखल केले.याबद्दल अधिक माहिती अशी कि,  समाधान यांना दम्याचा दुर्धर आजार जडला होता, त्यात उपचार करूनही त्रास कमी होत नसल्याने ते कंटाळले होते. दुपारच्या सुमारास त्यांची दोन्ही मुले घरात अभ्यास करत बसली होती. त्याच वेळेस त्यांनी त्यांच्या वृद्ध आईस किरणा दुकानावर पाठवले. स्वतः घरात जावून मुलांजवळील पलंगावर झोपलेले असताना मुलांची नजर चुकवून त्यांनी अचानक छताच्या पंख्याला रुमालाने गळफास घेतला. हे दृष्य बघताच मुलांनी घरातून पळ काढत शेजाऱ्यांकडे धाव घेतली.दरम्यान,  शिवसेना पदाधिकारी विजय बांदल यांनी तत्काळ इतर तरुणांच्या मदतीने समाधान सुरवाडे यांचा मृतदेह खाली उतरवून जिल्‍हा रुग्णालयात हलवले. येथे तपासणी केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured