Type Here to Get Search Results !

विवाहित महिलेचा मृतदेह आढळला विहिरीत; आत्महत्या की हत्या ?



बीड : बीडच्या जप्ती पारगाव गाव परिसरात  गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहित महिलेचा विहिरीत मृतदेह आढळल्याचे समोर आले आहे. पल्लवी सखाराम चव्हाण (वय 19 राहणार हिरापूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, पल्लवी चव्हाण या गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होत्या. यादरम्यान त्यांचा शोध सुरू असताना शनिवारी उशिरा त्यांचा मृतदेह जप्ती पारगाव शिवारातील सुनील हिंगेकर यांच्या शेतात असलेल्या विहिरीत आढळल्याचे समोर आले.



दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पल्लवी चव्हाण यांची आत्महत्या की हत्या ? याचा शोध पोलीस घेत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies