Type Here to Get Search Results !

इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून पडून ५ वर्षीय मुलाचा मृत्यू!



मुंबई: भायखळा परिसरात रविवारी मुंबईतील इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून पडून एका पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 


याबद्दल अधिक माहिती अशी कि, मुंबईतील भायखळा परिसरात इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून पडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी 10 वाजता घडली. पोलिसांनी  प्राथमिक तपास केला असता, साहिल हा छत्री घेऊन खिडकीच्या जवळच खेळत होता. खिडकीच्या बाजूला तो झुकलेला होता. त्याचवेळी खिडकी अचानक उघडली. मुलाचा तोल गेला आणि तो खिडकीतून खाली पडला. मुलगा पडल्याचे पाहून तिथल्या नागरिकांनी त्याला लगेच रुग्णालयात नेले.



दरम्यान,  खिडकीला कोणत्याही प्रकारचे ग्रील नव्हते. मुलगा खिडकीच्या बाजूला छत्रीसोबत खेळत असताना तो खिडकीच्या बाजूला झुकला आणि तोल जाऊन खाली पडला. मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies