Type Here to Get Search Results !

“धनुष्यबाण' हा फक्त सच्चा शिवसैनिकांचा, तो बंडखोरांचा...”: विनायक राऊतांचे वक्तव्य!

 


सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या राजकारणात बंडखोरीचा वादळ निर्माण करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने आम्ही शिवसेनेचेच आहोत, असा नारा लावल्याने, शिवसेना नेमकी कुणाची ? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची की, एकनाथ शिंदे गटाची ? असे प्रश्न राजकीय वर्तुळात अनेकांना पडले आहेत. तसेच,  शिवसेनेचे अधिकृत चिन्ह शिंदे गटाला मिळणार का, याबाबतही मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहेत.  अशातच आता  शिवसेनेच्या चिन्हाबाबत खासदार विनायक राऊत यांनी मोठं विधान केले. 



विनायक राऊत म्हणाले,कि  धनुष्यबाण हा फक्त सच्चा शिवसैनिकांचा तो बाडग्यांचा नाही. धनुष्यबाण आणि शिवसेनेचे नाते कोणीही तोडू शकत नाही. तो फक्त उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा. काल पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी न केलेल्या विधानाबाबच मीडियात बातम्या झळकल्या. याद्वारे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो.

दरम्यान, आता शिवसेनेचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष वेधले असून , राजकीय चर्चाना जोरदार उधाण आलेले दिसून येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies