Type Here to Get Search Results !

यूट्यूबवर कमी व्ह्यूज मिळण्याच्या कारणावरून २३ वर्षीय तरुणाने केली आत्महत्या!



नवी दिल्ली : आयआयटीएम ग्वाल्हेरच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यूट्यूब चॅनलला व्ह्यूज कमी मिळत असल्याने या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, आयआयटीएम ग्वाल्हेरमध्ये शिकणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने काही दिवसांपूर्वी आपले SELFLO यूट्यूब चॅनल तयार केले होते. या विद्यार्थ्याला अपेक्षा होती की,  आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप व्ह्यूज मिळतील, त्याचा कंटेंट लवकरच व्हायरल होईल. पण अपेक्षेप्रमाणे काही घडले नाही, त्यामुळे तो अस्वस्थ होऊ लागला. त्यांची मानसिक स्थिती ढासळू लागली. मात्र, त्यावेळी नाराज होऊन विद्यार्थी आत्महत्येसारखे पाऊल उचलेल, असे कोणालाच वाटले नव्हते. या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर त्याला घरातूनही फारशी साथ मिळत नसल्याचे समोर आले आहे. 



दरम्यान, याप्रकरणी सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies