Type Here to Get Search Results !

अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या!



बुलडाणा : मोताळा तालुक्यातील वडगाव येथे अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. किशोर श्रीकांत शेळके (४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 



किशोर शेळके यांच्याकडे साडेतीन एकर कोरडवाहू शेती आहे. सततची नापिकी व कर्जाचा वाढता बोजा यामुळे ते चिंतेत होते. नापीकीमुळे शेतीला लावलेला खर्चही निघत नव्हता. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करून कर्ज कसे फेडावे या चिंतेत ते होते. त्यामुळे रविवारी दुपारी घरात असताना घरातील लाकडी दांड्याला त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.


दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies