Type Here to Get Search Results !

बापानेच मुलाची हत्या करून शरीराचे ग्राइंडरने केले तुकडे!



अहमदाबाद:  वासणा परिसरात शिर, हात आणि पाय नसलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेच्या 5 दिवसांनंतर वासणापासून 3 किमी अंतरावरील एलिसब्रिज परिसरातून कापलेले पाय सापडले. हा मृतदेह हितेश नावाच्या २१ वर्षीय तरुणाचा असून त्याच्या वृद्ध वडिलांनीच त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.  आरोपी पित्याने ग्राइंडरने मुलाच्या शरीराचे छोटे तुकडे केले. त्यानंतर शरीराचे छोटे तुकडे काळ्या पॉलिथिनमध्ये टाकून अवयव वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. 22 जुलै रोजी अहमदाबादमध्ये हात, पाय आणि शिर कापलेला मृतदेह सापडला होता.


याबद्दल अधिक माहिती अशी कि,  गेल्या 5-6 वर्षांपासून मुलगा दारू आणि ड्रग्जच्या आहारी गेला होता, त्या दिवशीही तो दारू पिऊन पैशाची मागणी करत होता. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर वडिलांनी घरात ठेवलेल्या दगडाने त्याच्या डोक्यात जोरदार प्रहार केल्याने त्याचा मृत्यू झाला. तसेच,  मुलाच्या मृत्यूनंतर आरोपी वडील अहमदाबादच्या कालुपूर मार्केटमध्ये गेले, तेथून ग्राइंडर मशीन आणली. यानंतर त्यांनी मुलाच्या शरीराचे छोटे तुकडे केले. त्यानंतर ते तुकडे कचऱ्याच्या काळ्या पॉलिथिनमध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले.


दरम्यान, मृतदेह आणि पाय पोलिसांनी जप्त केले आहेत. चौकशीत अमली पदार्थाच्या सवयीमुळे वडिलांनीच मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. सध्या पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies