Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरेंची आणखी वाढली डोकेदुखी ; केडीएमसीतील ५५ पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे गटात!


मुंबई: शिवसेनेत पडलेली मोठी फूट आणि भाजपने शिंदे यांना दिलेले मुख्यमंत्रीपदामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. त्यामुळेच अनेक नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. ठाण्यातील शिवसेनेचे ६६ नगरसेवक तर नवी मुंबईतील शिवसेनेचे ३० नगरसेवक शिंदे गटात सामील झाले होते. आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील ५५ पेक्षा जास्त नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले आहेत, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.


गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी रात्री कल्याण-डोंबिवलीमधील महानगरपालिकेतील नगरसेवकांची भेट घेतली होती. त्यानंतर केडीएमसीचे ५५ पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. तसेच,  डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे सुद्धा शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies