Type Here to Get Search Results !

‘या’ दिवशी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर शिंदे गटात करणार प्रवेश?



मुंबई: शिवसेनेचे जालना जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याची माहिती समोर आली असून, अर्जुन खोतकर 31 जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात अर्जुन खोतकर यांचा प्रवेश होणार असल्याचे पुढे येत आहे. अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार काही वेळापूर्वी दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तिथे त्यांची चर्चा झाली.


जालना जिल्ह्यातील महत्वाचे नेते आणि माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला असल्याची चर्चा आहे. ईडीच्या कारवाईमुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र खोतकर यांनी अजूनही आपण शिवसेनेत असून, फोटोवर अंदाज बांधू नका असे वक्तव्य केले होते.



दरम्यान, आज अर्जुन खोतकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अब्दुल सत्तार देखील उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies