Type Here to Get Search Results !

पुणे: प्रियकरासोबत लॉजवर गेली तरुणी अन रक्ताच्या थारोळ्यात....!



पुणे : पुण्यातील स्वारगेट-सातारा रस्त्यावरील काल रात्री एका लॉजवर प्रियकरासोबत गेलेल्या प्रेयसीचा तीक्ष्ण शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे. सकाळी रूमची साफसफाई करण्यास आलेल्या कामगाराने रूमची पाहणी केली असता त्याला बाथरूममध्ये तरूणीचा मृतदेह दिसून आला. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, दिप्ती काटमोडे (वय २४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मृत दिप्ती ही आपल्या प्रियकरसोबत रविवारी रात्री लॉजवर आली होती. 



दरम्यान आज  सकाळी नेहमीप्रमाणे रुमची साफसफाई करण्यासाठी लॉजवरील कर्मचारी रूममध्ये गेला असता, त्याला बाथरूममध्ये तरुणीचा रक्ताचा थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला. दिप्तीची हत्या तिच्याच प्रियकराने केली असावी असा पोलिसांना संशय आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies