मुंबई: आरे कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे आता आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. आरे कारशेडला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कारशेडवर स्थगिती दिली होती.
काही दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरे कारशेड तिथेच होणार असल्याचे संकेत दिले होते. 'कारशेडचे काम झाल्याशिवाय मेट्रो सुरु होणार नाही. तसेच, ठाकरे सरकाने सुचवलेली कांजूरमार्ग येथील जागा वादात आहे. ठाकरे सरकारने दिलेल्या जागेवर आता काम सुरु केले तरी ते पुर्ण व्हायला जवळपास ४ वर्ष लागणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी कारशेड त्याच ठिकाणी करणार असल्याचे फडणवीस म्हणाले होते.
दरम्यान, आरे मधील जंगल तोडू नये म्हणून पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंदी उठवल्यानंतर पुन्हा आरे कारशेडचे काम सुरू होणार आहे.