Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, बुधवार १३ जुलै २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

रेस, जुगार यातून लाभ संभवतो. कौटुंबिक सौख्याला अधिक प्राधान्य द्याल. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल. आवडत्या साहित्यात रमून जाल. छंद जोपासायला वेळ काढाल.


वृषभ:-

स्वछंदीपणे दिवस घालवाल. बाहेरील परिस्थितीचा अंदाज घेऊन खरेदी कराल. समोरील प्रत्येक गोष्टीत रमून जाल. आपल्या आजच्या सर्व इच्छा पूर्ण करून घ्याल. घरातील गोष्टींसाठी वेळ द्यावा.



मिथुन:-

घरगुती जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. कामात भावंडे सहकार्य करतील. केलेल्या कष्टाचे समाधान मिळेल. जवळचा प्रवास सुखकर होईल. काही खर्च अनाठायी होऊ शकतात.

कर्क:-

कौटुंबिक गोष्टीत अधिक वेळ जाईल. पैशाचा अपव्यय टाळावा. खोट्या गोष्टींना भुलू नका. एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी अडून राहू नका. वयस्कर व्यक्तींचा मान राखाल.



सिंह:-

मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत करावा. कमीपणा घ्यायला घाबरू नका. नवीन मित्र जोडले जातील. आवडत्या गोष्टीत अधिक रमून जाल.

कन्या:-

विचारांच्या गर्दीत भरकटू नका. कल्पनेत रमून जाऊ नका. बोलतांना तारतम्य बाळगा. कामाची योग्य दिशा ठरवा. कृतीला अधिक महत्त्व द्यावे.



तूळ:-

मनातील इच्छा पूर्ण होईल.  चांगला व्यावसायिक लाभ होईल. अपेक्षित लाभाने समाधान मिळेल. व्यावसायिक दर्जा सुधारेल. आपली आजची आर्थिक गरज पूर्ण होईल.

वृश्चिक:-

वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. व्यापारी वर्गाला नवीन धोरण आखता येईल. सन्मानाने भारावून जाल. कर्तुत्वाला वाव देता येईल. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.



धनू:-

तरुणांचे नवीन विचार जाणून घ्या. दैनंदिन कामात थोडा बदल करून पाहावा. आईचे उत्तम सहकार्य मिळेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. सबुरीच्या मार्गाने समोरील प्रश्न हाताळा.

मकर:-

अचानक धनलाभाची शक्यता.जोडीदाराची प्राप्ती वाढेल. काम आणि वेळ यांचा योग्य मेळ घालावा.  पण त्याबरोबरच एकमेकांना समजून घ्यावे लागेल. वैचारिक मतभेदाला बाजूला ठेवावे. 



कुंभ:-

घरगुती वातावरण प्रसन्न राहील. अतिआवश्यक असेल तरच बाहेर पडावे. भागीदारीत मतभेद संभवतात. संपर्कातील लोकांशी घनिष्ठता वाढेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील.

मीन:-

आततायीपणे वागून चालणार नाही. मुलांच्या वागण्याचा अचंबा वाटेल. हातातील कलागुण विकसित करावेत. कामातून समाधान लाभेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies