Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन केला अत्याचार; आरोपींमध्ये महिलेचा समावेश!



अहमदनगर : तीन नराधमांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. प्रियंका अशोक खडके (२४), सोमनाथ दत्तू धुळे (१९) व श्रावण संजय गायकवाड (१८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  नगर तालुक्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 



या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून पीडितेची सूखरुप सुटका केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies