Type Here to Get Search Results !

सोशल मीडियावर चाईल्ड पॉर्नचा व्हिडिओ प्रसारित केल्याने तरुणाला अटक!




बीड : बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात चाईल्ड पॉर्नचा व्हिडिओ, सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी बीड सायबर पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी अ. गोविंद क्षीरसागर वय ३२ रा. संत नामदेव नगर, धानोरा रोड याला अटक केली आहे. 



दरम्यान, बीड येथून चाईल्ड पॉर्न व्हिडिओ अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर प्रसारित केल्याची माहिती राज्य सायबर कडून बीड सायबर पोलीसांना मिळाली होती.



तसेच, याप्रकरणात पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून, बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात  अज्ञात आरोपीवर कलम २९४ भादंवि सह कलम १३ (४), १४ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधि सह ६७ (ब) माहिती तंत्रज्ञान अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies