Type Here to Get Search Results !

आटपाडी: चोरट्यांनी फोमच्या गाद्यासह एसी केला लंपास!



आटपाडी: आटपाडी येथील आटपाडी -दिघंची रस्त्यावरील फार्म हाउस मध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करत फोमच्या गाद्यासह एसी लंपास केल्याची घटना घडली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, आटपाडी – दिघंची रस्त्यालगत शिवाजी भगवान पाटील यांची शेती असून त्याठिकाणी त्यांचे फार्म हाउस आहे. या ठिकाणी दिनांक १५ ते १६ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी करत फार्म हाऊस मधील एसी, फोमच्या गाद्या, पिण्याचे पाणी शुद्ध करण्याचा अक्वा गार्ड सह भांडी असा एकूण एक लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.



दरम्यान, या घटनेबाबत शिवाजी भगवान पाटील यांनी आटपाडी पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध फिर्याद दिली असून सदर घटनेचा अधिक तपास पीएसआय गोसावी करत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies