Type Here to Get Search Results !

मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचे खातेवाटप; कोणाला किती खाती मिळणार?

 


मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपची सत्ता स्थापन झाली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, नव्या सरकारमध्ये कोणाला किती खाती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. 


नव्या सरकारमध्ये लवकरच खाते वाटप होणार असून 28 खाते हे भाजपकडे तर 15 खाती ही शिंदे गटाला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.  गृह महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, उच्च आणि तंत्रशिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, ओबीसी विकास ही पदे भाजपकडे असतील.


तसेच,  शिंदे गटाकडे नगरविकास, खाणकाम, वाहतूक, पर्यावरण, रोजगार हमी, फलोत्पादन, शालेय शिक्षण, मृदा व जलसंधारण, उद्योग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात  आहे. शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. 


 दरम्यान, अर्थ, महसूल आणि गृह ही तिन्ही प्रमुख खाती भाजपकडे गेली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies