Type Here to Get Search Results !

देशात कोरोनाची चौथी लाट येणार?; कोरोनाचे ‘इतके’ नवीन रुग्ण!



नवी दिल्ली - देशात नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. मात्र, मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 13,615 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 20 रुग्णांच्या मृत्यूनंतर, संपूर्ण भारतात संसर्ग कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या आता 5,25,474 इतकी झाली आहे.


दरम्यान, गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 1,189 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान २ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1529 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 18,027 वर गेली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies