Type Here to Get Search Results !

संजय राऊतांना होणार अटक ?: ‘यांचे’ मोठे वक्तव्य!



मुंबई: आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीने पथक दाखल झाले. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 



संजय राऊत यांना ईडीची भीती वाटत नाही. ईडीने आज सकाळी एवढ्या मोठ्या फौजफाट्यासह धाड टाकली याचा अर्थ त्यांना अटक होऊ शकते. संजय राऊत काही मास लीडर नाहीत. या देशात कायद्याचे राज्य आहे. संजय राऊत यांनी काही केले असेलतर त्यांना काही होणार नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी केले.



तसेच ते पुढे म्हणाले, “संजय राऊत यांनी बाळासाहेबांची शपथ घेऊ नये. शपथ घेण्याची अधिकार फक्त आम्हाला आहे, आम्ही सेनेत ४० वर्ष काढली आहेत. शिवसेना तुम्ही काढू नका उद्धव ठाकरे एक दिवस तुम्हाला बाहेर काढतील. शरद पवार यांच्या नादाला लागून यांनी शिवसेनेची वाट लावली आहे, असे भाष्य करत संजय शिरसाट यांनी राऊतांवर आरोपही केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies