Type Here to Get Search Results !

महिला पोलीस अधिकाऱ्याला वाहन तपासणी करताना पिकअपखाली चिरडले; महिला पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू!


रांची: झारखंडच्या रांची जिल्ह्यात वाहन तपासणी सुरू असताना एका महिला पोलीस अधिकाऱ्याला पिकअप व्हॅनखाली चिरडून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर चालक पळून गेला. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  रांची जिल्ह्यातील तुपुदाना परिसरात बुधवारी मध्यरात्री तीन वाजता पोलीस एसआय संध्या टोपनो वाहन तपासणी करत होत्या. त्याचवेळी एका महिला पोलीस अधिकाऱ्याने पिकअप व्हॅनला थांबवण्याचा प्रयत्न केला. वाहनचालकाने त्यानंतर पिकअपचा वेग वाढवला. पिकअप व्हॅन या पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर घातली. व्हॅनची धडकेत  महिला पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांनतर आरोपी चालक घटनास्थळावरून पसार झाला.




दरम्यान,  घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला.. या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies