Type Here to Get Search Results !

तासगाव: पत्नी नांदायला येत नाही म्हणून तरुण चढला विजेच्या खांबावर अन...!तासगाव: तासगावमध्ये पत्नी नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून एकाने दारू पिऊन विजेच्या खांबावर चढून सुमारे तासभर विजेच्या तारांवर सर्कस करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर त्याला पोलीस आणि नागरिकांनी अथक प्रयत्नानंतर मद्यपी तरुणास खाली उतरवले आहे.याबद्दल अधिक माहिती अशी कि,  तासगाव शहरातील विटा नाका येथे भर रस्त्यातील एका विजेच्या खांबावर मद्यपी पतीचे हे भयानक कृत्य पाहायला मिळाले.  प्रशांत माळी नावाच्या तरुणाने पत्नी नांदायला येत नसल्याने थेट विजेच्या खांबावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा तरुण दारूच्या नशेत विजेच्या खांबावर चढू लागला. काही नागरिकांनी तात्काळ याची माहिती वीज वितरण विभागाला दिली. यावेळी लगेच वीज वितरणचे कर्मचारी घटनेच्या ठिकाणी उपस्थित झाले, आणि विजेचा पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे अनर्थ टळला. सुमारे तासभर प्रशांत हा सर्कशीतील व्यक्तीप्रमाणे विजेच्या खांबावर थरारक कसरत करत होता. दरम्यान,  प्रशांत माठी हा तरुण दारुच्या नशेत विटा नाका येथे रस्त्यातील एका विजेच्या खांबावर चढला. नागरिकांनी वेळ न दडवता लगेच वीज वितरण कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी अगोदर त्या खांबावरुन जाणारी वीज बंद केली. त्यामुळे अनर्थ टाळला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies