Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष; जाणून घ्या महत्वाच्या घटना!आटपाडी:  आज  आषाढ अमावास्या गुरुवार, 28 जुलै 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. या अमावास्येला दीपपूजनाला अधिक महत्व प्राप्त झाले असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 


28 जुलै : आषाढी अमावस्या 

या वर्षीची आषाढ अमावास्या गुरुवार, 28 जुलै 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. या अमावास्येला गुरुपुष्यामृत योग देखील आहे. या अमावास्येला दीपपूजनाला अधिक महत्व प्राप्त झाले असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. बुधवार 27 जुलैला अमावस्या प्रारंभ होणार आहे.28 जुलै : कॉमनवेल्थ गेम्स.

2022 कॉमनवेल्थ गेम्स, अधिकृतपणे XXII कॉमनवेल्थ गेम्स म्हणून ओळखले जातात आणि सामान्यतः बर्मिंगहॅम 2022 म्हणून ओळखले जातात, हे कॉमनवेल्थच्या सदस्यांसाठी एक आंतरराष्ट्रीय बहु-क्रीडा स्पर्धा आहे जी 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2022 दरम्यान बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे होणार आहे. लंडन 1934 आणि मँचेस्टर 2002 नंतर इंग्लंडने तिसऱ्यांदा कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद भूषवताना 21 डिसेंबर 2017 रोजी बर्मिंगहॅमला यजमान म्हणून घोषित केले.28 जुलै : जागतिक हिपॅटायटिस दिवस 

हिपॅटायटिस हा एक संसर्गजन्य रोग असून त्यामुळे यकृताला सूज येते, जळजळ निर्माण होते. हिपॅटायटिसचे ए, बी, सी, डी आणि ई असे पाच प्रकार आहेत. हा संसर्गजन्य रोग जरी असला तरी अनेकवेळा अल्कोहोलचे अतिरिक्त सेवन, टॉक्सिन, अनावश्यक औषधांचा अतिरिक्त डोस अशा इतर कारणांमुळेही याची लागण होते. जगातील अनेक लोकांना आपल्याला नेमकं काय होतंय हेच समजत नाही आणि ज्यावेळी हे समजतं त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. हिपॅटायटिस हा असाच एक संसर्गजन्य रोग आहे. अनेकांना याची लागण झालेली समजत नाही. त्यामुळे जगभरातल्या लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. या रोगाबद्दल सामान्य लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै हा दिवस जागतिक हिपॅटायटिस दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय. 


जागतिक निसर्ग संवर्धन दिन :

दरवर्षी 28 जुलै रोजी ‘जागतिक निसर्ग संवर्धन दिन ’ साजरा केला जातो. पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात विविध ठिकाणी हा दिवस साजरा करण्यात येतो. 


1821 साली पेरू देशाला स्पेन राष्ट्रापासून स्वातंत्र्य मिळालं.

1968 साली नोबल पारितोषिक विजेता रेडिओएक्टिव्हिटी आणि रेडिओकेमिस्ट्री क्षेत्राचे प्रणेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑट्टो हॅन(Otto Hahn) यांचे निधन.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies